राज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनची आवक कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. लातूर, अकोला आणि वाशीम बाजारात चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४,७०० ते ४,९५० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. जागतिक बाजारात सोयाबीन खाद्यतेलाच्या दरात झालेली वाढ आणि देशांतर्गत सोयापेंडची वाढती मागणी यामुळे लवकरच सोयाबीनचे दर ५,००० रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.