पावसाच्या खंडामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम दुष्काळ मदत देण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत थेट बँक खात्यात (DBT) निधी वर्ग करण्याबाबत ठोस निर्णय अपेक्षित असून, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे.