लासलगाव बाजार समितीत २१ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला कमाल ४,७०० रुपये, तर सरासरी ४,२७० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याची कमी आवक आणि खरीप हंगामातील विलंबामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर प्रति किलो ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून, यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.