महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करत महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता लाभार्थ्यांना सरकारी कार्यालये किंवा अंगणवाडी केंद्रांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही, ते घरबसल्या अर्ज करू शकतात. ही योजना मुलींच्या जन्मापासून ते अठराव्या वर्षापर्यंत एूण ₹१,०१,००० ची आर्थिक मदत देते, ज्यामुळे कुटुंबांना थेट आणि सोप्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणे आता शक्य झाले आहे.