चेन्नईमधील एका ग्राहकाने झेप्टो या ऑनलाइन ग्रॉसरी प्लॅटफॉर्मवरून फूलकोबीची ऑर्डर दिली होती. घरपोच मिळालेल्या भाजीची पाकिटे उघडल्यानंतर ग्राहकाला धक्का बसला, कारण ती निकृष्ट दर्जाची होती. घरपोच भाजीपाला मागवताना वेळेची बचत होते, परंतु अशा प्रकारच्या घटनेमुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरील गुणवत्तेच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.