भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने नवी दिल्लीत सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रीकल्चर, एमएसएसआरएफ आणि भारत कृषक समाजासोबत सामंजस्य करार केला आहे. हा उपक्रम राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे दस्तऐवजीरण करणार आहे. कॅप्चरिंग फार्मर इनोव्हेशन इन नॅचरल फार्मिंग ट्रान्झिशन्स या नावाचा हा संयुक्त संशोधन अभ्यास देशभरात शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.