महाराष्ट्र कृषी विभागाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या तीन प्रलंबित हप्त्यांसाठी वित्त विभागाकडे १,८२२.५४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या निधीचा लाभ राज्यातील ९१.१२ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊनही राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने शेतऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. वित्त विभागाकडून अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत आहे.
नमो शेतकरी योजना: प्रलंबित हप्त्यांसाठी १,८२२ कोटी रुपयांची मागणी
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा