चालू गळीत हंगामात उसाला ५५०० रुपये दर मिळाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जयसिंगपूर येथील २५ व्या ऊस परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव ५० रुपये आणि इथेनॉल दर ७० रुपये करावा, अशी मागणी केली. १२ ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय नाही झाल्यास १३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र व कर्नाटकात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.