महाराष्ट्रातील वसमत एपीएमसी बाजार समितीत हळदीचे भाव ₹३३,३३३ प्रति क्विंटल या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सणासुदीच्या काळात मर्यादित आवक आणि वाढती मागणी यामुळे हे दर वधारले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेतील सध्याच्या स्थितीमुळे हळदीला हे विक्रमी भाव मिळत आहेत. या दरवाढीमुळे दिवाळीच्या काळत स्थानिक हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.