महाआयटीच्या डेटा सेंटर स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावतीकरणामुळे महाडीबीटी पोर्टल १६ ऑक्टोबर दुपारी ४ वाजल्यापासून तात्पुरते बंद आहे. ही सेवा २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तांत्रिक कामामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी येत आहेत. पालकांनी शासनाकडे अर्ज भरण्याची मुदत वाढवून दण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल आणि त्यांना अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.