भारतातील वाढत्या तापमानामुळे कृषी उत्पादनात घट आणि बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहेत. शेतकऱ्यांना केळी पिकांसह भेंडी आणि दुधी भोपळा यांसारख्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हवामान अनुकूलन वित्त आणि सुारित अंदाज प्रणालीची तातडीने गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या हवामान बदलामुळे देशाच्या अन्नसुरक्षेसमोर मोठे संकट निर्माण झाले असून शेतीसाठी तातडीने गुंतवणुकीची आवश्यकता आहे.