महाराष्ट्रातील माळशेज परिसरात कांदा लागवडीचा खर्च प्रति एकरी ₹९०,००० ते ₹९५,००० पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये मजुरीसाठी ₹१२,०००, रोपांसाठी ₹१८,००० आणि खते-कीटकनाशकांसाठी ₹३०,००० खर्च अपेक्षित आहे. वाढती मजुरी, खतांचे दर आणि दुष्काळाच्या सावटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, एकूण उत्पादन खर्च लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने उत्ादक चिंतेत आहेत.