बुंदेलखंड भागातील केन-बेतवा नदी जोड प्रकल्पांतर्गत भूसंपादन आणि विस्थापनाच्या मुद्द्यावर शेतकरी व आदिवासी बांधवांनी आंदोलन केले. सुपीक शेतजमिनीचे योग्य मूल्यांकन, विस्थापितांना न्याय्य भरपाई आणि स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे कालवा पाणी देण्याची हमी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काम रोखण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.