मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी तब्बल १२५ टन ऊस उत्पादन साध्य केले आहे. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे पाणी व्यवस्थापन, खत मात्रा आणि पीक संरक्षणात मोठी मदत होत आहे. दुष्काळी भागात तंत्रज्ञानाचा हा वापर वरदान ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. या आधुनिक प्रगत तंत्रज्ञानामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.