राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असून बहुतांश भागांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ प्रणालीमुळे हवामान विभागाने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काढणीला आलेले सोयाबीन व वेचणीचा कापूस भिजणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.