बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली असून विहिरी, तलाव आणि नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. पावसाअभावी खरीप हंगाम हातून गेला असताना आरडव येथील तरुण शेतकरी शैलेश सरकटे यांनी आपली लाखमोलाची हळद वाचवण्यासाठी ७ ते ८ किलोमीटर अंतरावरून प्रत्येकी १ हजार रुपये खर्चून पाण्याचे टँकर मागवण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन खर्चात प्रचंड वाढ आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.