यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झाला असून, हे तालुके ट्रिगर-१ श्रेणीत आहेत. पावसाच्या खंडामुळे कापसाचे उत्पादन २५-५० क्विंटलवरून थेट ५-८ क्विंटलवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जामुळे जनावरे विकली आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १२ सवलती जाहीर केल्या आहेत, मात्र पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून सण साजरे करणे कठीण झाले आहे.