हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी तेजी-मंदी दिसून येत आहे. सप्टेंबरअखेर ५,६०० रुपयांपर्यंत खाली आलेले दर पुन्हा उसळी घेत ७,१०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खाद्यतेलाचे दर, देशांतर्गत प्रक्रिया उद्योगांची खरेदी आणि आवकेचे प्रमाण यावर दिवाळीनंतर सोयाबीनचे दर ७,५०० रुपयांची पातळी गाठणार की स्थिर राहणार हे अवलंबून असल्याचे बाजार विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.