नाशिक जिल्ह्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना २०२६ अंतर्गत आंबिया बहारात काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब व मोसंबी पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून विहित मुदतीत कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, जेणेकरून हवामान धोक्यांपासून पिकांना संरक्षण मिळेल व नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.