वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि एनएचआरडीएफ, नवी दिल्ली यांनी ११ नोव्हेंबर रोजी कांदा व लसूण संशोधनासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. रब्बी हंगामापासून सुरू होणाऱ्या या भागीदारीत सुधारित वाण, आधुनिक साठवणूक तंत्रज्ञान आणि काढणीपश्चात संशोधनावर भर दिला जाणार आहे. दोन्ह संस्था संयुक्तपणे बियाणे मूल्यमापन आणि कृषी अवजारांच्या विकासाद्वारे उत्पादन क्षमता वाढवून शेतकऱ्यांचा साठवणूक खर्च कमी करण्यासाठी काम करतील.