छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आणि भूजल पातळी खालावल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेली मोसंबीची झाडे सुकू लागल्याने बागायतदारांचे वर्षाचे श्रम आणि लाखो रुपयांचे भांडवल वाया गेले आहे. दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी विकत घेऊनही बागा वाचवणे अशक्य झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून फळबागांसाठी विशेष नुकसानभरपाई पॅकेज देण्याची मागणी केली जात आहे.