राज्यातील पीकविमा योजनेतील ॲड ऑन कव्हर पूर्ववत लागू करावे, अशी प्रमुख मागणी शेतकरी संघटना आणि नेत्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. विमा पॉलिसीतील नुकत्याच केलेल्या बदलांमुळे शेतकरी आणि राज्य सरकार दोघेही अडचणीत आले आहेत. या बदलांमुळे विम्याची भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून, सर्वसमावेशक आर्थिक संरक्षणासाठी धोरणात तातडीने सुधारणा करून दिलासा देण्याची आत्तिक मागणी यावेळी करण्यात आली.