महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रलंबित हप्ते लवकरच वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी दोन हप्त्यांच्या प्रतीक्षेत असून, त्यांना प्रत्येकी 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ही थेट लाभ हस्तांतरण योना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते आणि आता सरकार या रखडलेल्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करत आहे.