प्रधानमंत्ी किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी तीन आवश्यक अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, बँक खात्याशी आधार सीडिंग करणे आणि पोर्टलवरील माहिती अचूक ठेवणे गरजेचे आहे. या पूर्ततेमुळे दोन हजार रुपयांचा हप्ता सुरळीत जमा होईल, तर मागील प्रलंबित रक्कम असल्यास एकूण चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.