पाश्चात्य वाऱ्यांमुळे मान्सूनच्या माघारीला विलंब झाला आहे. राज्यात कमाल तापमान ३६.२ आणि किमान तापमान २६.९ अंश सेल्सिअस असून ७३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी तात्पुरती थांबवावी आणि काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.