मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले मका पीक भुईसपाट झाले असून शेतांमध्ये पाणी साचल्याने धान्याला कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेत तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.