केंद्र सरकार आदिवासी समुदायांना लाभ मिळवून देण्यासाठी लघु वनोपजाच्या किमान आधारभूत किंमत यंत्रणेत बदल करणार आहे. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटला सध्याच्या एमएसपी आराखड्याचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. एमएसपी दरातील स्थिरता आणि वन-आधारित समुदायांचे शोषण रोखण्यासठी ही नवीन यंत्रणा राबवली जाणार असून, यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल.