विविध बाजार समि्यांमध्ये नव्या खरीप कांद्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. स्थानिक शेतशिवारातून आवक सतत होत असल्याने कांद्याचे दर खाली येत असून उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. सणासुदीची मागणी वाढेपर्यंत बाजारातील दर असेच मंदीच्या छायेत राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.