महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका संतप्त शेतकऱ्याने संपूर्ण पीक कर्जमाफी आणि रखडलेली नुकसानभरपाई मिळवण्यासाठी थेट तहसील कार्यालयात धडक मारत आंदोलन केले. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बैलावर स्वार होत तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत या शेतकऱ्याने शासकीय आर्थिक मदतीचे त्वरित वाटप करण्याची आग्रही मागणी केली.