जालना व मराठवाड्यात आज ऑक्टोबर हीटचा प्रभाव असून कमाल तापमान ३३.४ अंश आणि किमान तपमान २३.६ अंश सेल्सिअस आहे. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. वारे ताशी १२ किमी वेगाने वाहतील. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे व मळणीची कामे उरकून घ्यावीत.