महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लेक लाडकी योजनेचे अर्ज आता महाडीबीटी २.० पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना अंगणवाडीत न जाता घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. कागदपत्रांची संख्या कमी करून प्रक्रिया सुलभ केली आहे. आतापर्यंत २,९८,६९५ लाार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.