ईडी आणि सीबीआयच्या कारवाईच्या भीतीपोटी साखर कारखानदार गळीत हंगाम लवकर सुरू करत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केला. १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू केल्यास उसाचा उतारा आठ टक्क्यांपेक्षा कमी राहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे ते म्हणाले. हंगामा १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करावा आणि साखरेचा किमान विक्री दर ५० रुपये प्रति किलो करावा, अशी मागणी त्यांनी केली.