गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या कापूस व भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानभरपाई व हमीभाव खरेदी केंद्रांच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले. स्थानिक एपीएमसी बाजार समित्यांमध्ये योग्य दर मिळावेत आणि शासकीय खरेदी विनाविलंब सुरू व्हावी, यासाठी शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.