कर्नाटकातील मालनाड भागात दीर्घकाळ पडलेल्या कोरड्या हवामानानंतर आता सलग पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल. वेळेवर झालेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान टळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.