जालना व मराठवाड्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहून ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढेल. आज कमाल तापमान ३३.४ अंश आणि किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यकतेनुसार सिंचन करावे व शेतीची कामे उरकावीत.