केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली आहे की भारत आणि इजिप्त पुढील ९० दिवसांत द्विपक्षीय व्यापार करारासाठी औपचारिक चर्चा सुरू करतील. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध दृढ होण्यास आणि कृषी निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित करारामुळे व्यापार प्र्रिया सुलभ होईल, ज्यामुळे इजिप्तच्या बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनांची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते.