सातारा येथे कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस तर किमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन करावे. जनावरांना सावलीत ठेवावे आणि सकाळच्या वेळी मळणी व काढणीची कामे उरकावीत.