मागील महिन्याइतकाच वीज वापर होऊनही अनेकांना जास्त वीज बिल येते. उशिरा घेतलेली मीटर रीडिंग, तीस दिवसांपेक्षा मोठा बिलिंग कालावधी, बदललेले दर, मागील थकबाकी, फिक्स चार्जेस किंवा घरातील जुनी उपकरणे जास्त वीज खेचत असल्‍यामुळे बिलाची रक्कम अचानक वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.