देशभरातील कोटीशू शेतकरी पीएम किसा सन्मान निधी योजनेच्या चोविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारने अद्याप दोन हजार रुपयांच्या आर्थिक मदतीच्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मागील हप्त्यानंतर चार महिने पूर्ण होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात पैसे जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.