महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये झेडपी सेस योजनेअंतर्गत कृषी साहित्यावर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान, ठिबक सिंचनासाठी अर्थसाहाय्य आणि ज्वारी, हरभरा व मक्याच्या बियाण्यांवर सवलत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांन या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्वरित ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे आणि यंत्रसामग्री स्वस्त दरात उपलब्ध होईल.