एफएसआयआय आणि एनएसएआयच्या अहवालानसार, भारतातील ११४.८ लाख हेक्टर कापूस क्षेत्रापैकी २४ ते ३० टक्के भागात अनधिकृत जीएम बियाण्यांची लागवड झाली आहे. शेतकरी सरकारी परवानगी नसलेल्या सीपी४-ईपीएसपीएस आणि विप३ए जनुके असलेल्या बियाण्यांचा वापर करत आहेत. हे अनधिकृत वाण तणनाशक सहनशील आणि कीड नियंत्रणासाठी वापरले जात असून, यामुळे देशाच्या जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.