काश्मरमधील पुलवामा, कुलगाम, अनंतनाग आणि गांदरबल जिल्ह्यांत यंदा भात पिकाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के अधिक पाऊस झाल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळाले. मुख्य कृषी अधिकारी वहीद उर रहमान यांनी सांगितले की, शालीमार राईस वाणांमुळे आणि अनुकूल हवामानामुळे पिकांची वाढ चांगली झाली. रोगप्रतिकारक वाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, अनेक वर्षांनंतर शेतकरी समाधानी आहेत.