महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते प्रलंबित असल्याने राज्यातील लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान आणि दुष्काळी मदतीचा निधी अद्याप वर्ग न झाल्याने शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने निधीचे नियोजन पूर्ण केले असून लवकरच थेट खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.