पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत १२ नोव्हेंबर २०२६ रोजी लसणाचा घाऊक दर १५,५०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. किरकोळ बाजारात दर २०० ते २८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी राज्यात ८४६ क्विंटल लसणाची आवक झाली, ज्यात नागपूर येथे सर्वाधिक १६,५०० रुपये दर मिळाला. दुष्काळामुळे लागवड कमी झाल्याने आगामी काळात लसणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वरतवण्यात आली आहे.