पुणे आणि पश्चिम घाटात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटाचा अंदाज असून यलो अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांनी काढणीची कामे तूर्तास थांबवावीत, काढलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा आणि फवारणी टाळावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे व शेतात पाण्याचा निचरा करावा.