पश्‍चिमी वाऱ्यांमुळे मान्सूनची माघारी लांबली आहे. महाराष्ट्रासह देशात ढगाळ वातावरण असून कमाल तापमान ३६.२ अंश तर किमान तापमान २६.९ अंश राहील. ७३ टक्के पाऊस शक्यता व हलक्या सरी पडतील. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी व काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे.